जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणला, ते शिवरायांचे गुरू नव्हे
![]() |
जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणला, ते शिवरायांचे गुरू नव्हे |
शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते. मात्र काहींच्या हाती लेखणी होती. त्यांनी या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम रामदासांनी केले, अशी कमाल लेखणीद्वारे केली. आणि आपण मानू लागलो की महाराजांचे कर्तृत्व हे रामदासांमुळे आहे. पण हे खरं नव्हे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या 'जाणता राजा' प्रकरणावर अखेर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. साताऱ्यातील एका कार्यक्रमात पवार म्हणाले, शिवाजी महाराज यांना 'छत्रपती' हीच उपाधी होती, 'जाणता राजा' नव्हती. जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणला. काही लोक म्हणतात की, रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते. हे साफ खोटे आहे. महाराजांच्या गुरू राजमाता जिजामाता याच होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे जिजामातांच्या संस्कारांतून घडले, असे पवार म्हणाले. मी कधीही मला 'जाणता राजा' म्हणा, असे कुणाला म्हणायला सांगितले नाही, असे सांगत पवारांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.
दरम्यान, पुण्यात शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'ज्या प्रकारे गणेशाची पूजा करताना काेणती परवानगी लागत नाही तशा प्रकारे महाराजांच्या वंशजांना काही विचारणे महत्त्वपूर्ण नाही. मात्र, उदयनराजे यांनी अापण छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत.'
शरद पवार म्हणाले, शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास 'जाणता राजा' ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती, असेच दिसून येते. रामदास स्वामींनी एका स्तुतीपर श्लोकात 'जाणता राजा' असे म्हटले आहे. पण शिवाजी महाराज यांना 'छत्रपती' हीच उपाधी होती हा इतिहास आहे.
Post a Comment