धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी हा नेता

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी हा नेता

धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने बीड विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो. आता या जागेवर कोण ताबा मिळवतं, हे पाहणं उत्कंठेचं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी दहा दिवसांत पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर काँग्रेस नेत्याला राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलं आहे. संजय दौंड राष्ट्रवादीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. परळी मतदारसंघात दौंड कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. 2014 मध्ये चारही पक्ष जेव्हा स्वबळावर लढले होते, तेव्हा संजय दौंड यांनी परळी मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीटासाठी फील्डिंग लावली होती.
संजय दौंड अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार आहे.
दुसरीकडे, भाजपतर्फे राजन तेली उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे. येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

 

No comments

Powered by Blogger.