भाजपाचा ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही :जावडेकर
![]() |
भाजपाचा ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाशी काहीही संबंध नाही :जावडेकर |
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद देशभरात रंगला आहे. आता याबाबत भाजपाने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नाही असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर जयभगवान गोयल यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील ते मी हेतूपुरस्सर केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन एवढा वाद निर्माण होण्याची गरज नाही असंही मयुख यांनी म्हटलं आहे.
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर भाजपाकडून पडदा टाकण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे वादग्रस्त लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. तसेच, हे पुस्तक देखील मागे घेण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या पुस्तकाशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही.
तसेच या अगोदर या पुस्तकाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिलं आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही असं भाजपाचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी देखील स्पष्ट केलं आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर संजय मयुख यांची प्रतिक्रिया ट्विट केली गेली आहे.
Post a Comment