गुजरात ATS नी पकडली 175 कोटींच्या ड्रग्जनी भरलेली बोट
गुजरातला लागून पाकिस्तानची मोठी सीमा असल्याने हा भागा कायम संवेदनशील असतो. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यापासून कराची बंदर हे जवळच आहे. त्यामुळे त्या भागातून सागरी मार्गाने कायम घुसखोरी केली जाते. असाच एक प्रयत्न गुजरात ATS आणि तटरक्षक दलाने Indian Coast Guard (ICG) उधळून लावला. एक पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसली असून त्यात अंमली पदार्थ आहेत अशी माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ATS आणि तटरक्षक दलाने एक मोहिम राबवत ती संशयीत बोट पकडली आणि त्यावरच्या पाच जणांना अटक केलीय. सुरक्षा दलाने या बोटीची जेव्हा झडती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
गुजरात एटीएस (ATS Gujarat)ला या प्रकरणी शुक्रवारी गुप्त माहिती मिळाली होती. गुजरातच्या किनाऱ्यावर ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ATSने ही माहिती तटरक्षक दलाला सांगितली त्यानंतर दोघांनीही मिळून एक संयुक्त मोहिम आखली. सर्व किनाऱ्यावर करडी नजर ठेवत असताना त्यांना एक बोट संशयास्पदरित्या येत असल्याचं आढळून आलं.
त्यांनी त्या बोटीला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बळजबरीने त्यांनी बोटीला अडवलं आणि झडती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला. या बोटीतून हेरॉईनची एक किलोंची 35 पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल 175 कोटी रुपये आहे. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आलीय. इसा भाट्टी (30), इस्माईल मोहम्मद कच्छी (50), अश्रफ उस्मान कच्छी (42), करीम अब्दुल कच्छी (37) अबुबकर अश्रफ सुमर (55) अशी अटक केलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची नावं आहेत.
Post a Comment