Google वर 'कोरोना' सर्चिंग... बिअरही ट्रेंडिंग मधे
![]() |
Google वर 'कोरोना' सर्चिंग... बिअरही ट्रेंडिंग मधे |
कोरोनाव्हायरसबाबत सर्च करताना लोकं Coronavirus beer, Corona virus beer, Virus corona beer हे सर्च करताना दिसत आहेत. गुगल ट्रेंडच्या मते, या व्हायरसबाबत शोधताना प्रसिद्ध बिअर ब्रँड शोधण्यातही आश्चर्यकारक अशी वाढ झाली आहे. अहवालानुसार असे सर्चेस हे ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा आणि अमेरिकेतील आहेत. कोरोना बिअर आणि कोरोनाव्हायरस यांच्या समान नावामुळे लोकं गोंधळलीत. मात्र कोरोना बिअर आणि कोरोनाव्हायरस यामध्ये काहीही साम्य नाही. तसंच कोरोना व्हायरस आणि कोरोना बिअरचाही काही संबंध नाही.
चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसचा धसका सर्वांनी घेतला आहे. कोरोना व्हायरस म्हणजे नेमका आहे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यामुळे कोरोनोव्हायरसबाबत माहिती करून देण्यासाठी गुगल सर्चिंग केलं जातं आहे. कोरोनाव्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणं, तो कसा पसरतो हे सर्व जाणून घेण्यासाठी गुगलवर What Coronavirus is, Symptoms of Coronavirus, How Coronavirus spread असे सर्च केले जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सर्चसह ट्रेंडमध्ये आहे तो Coronavirus beer.
कोरोना हा काय प्रकार आहे?
कोरोना व्हायरस हे नाव व्हायरसच्या आकारावरून पडलं आहे. एखाद्या मुकुटाप्रमाणे, प्रभेसारखा दिसणारा हा व्हायरस आहे आणि तो हवेमार्फत पसरतो. श्वसनप्रणाली आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनवर परिणाम करतो. याआधी severe acute respiratory syndrome corona virus (SARS-CoV) आणि Middle East respiratory syndrome corona virus (MERS-CoV) यांनी गेल्या 17 वर्षात शेकडो लोकांचे बळी घेतलेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या कोरोना व्हायरसला 2019-nCoVअसं नाव दिलं आहे.
MERS-CoV आणि SARS-CoV या कोरोना व्हायरसला झोनोटिक व्हायरल डिसीज म्हटलं जातं (zoonotic viral diseases) एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण थेट प्राण्यांमार्फत होते. मात्र नवीन क्रोनोव्हायरस व्यक्ती व्यक्तींमध्ये पसरत आहे, त्यामुळे गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे.
Post a Comment