तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना असतात :संजय राऊत

तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना असतात


संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला चढवलाउदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही उत्तर देण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावे लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगडे तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगड्या सगळ्यांना आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
मोदींनाही लोक प्रश्न विचारतात. राष्ट्रपतींनाही लोक प्रश्न विचारतात. ही लोकशाही आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्याची भाषा बोलू नये. तुम्ही राजकारणाबाहेर असतात तर चालले असते. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज आहोत. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी कोल्हापूरचे संभाजीराजे, साताराचे शिवेंद्रराजे यांची स्तुती सुद्धा केली. कोल्हापूरमधील सध्याचे शाहू महाराज यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांचे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकतंत्रात चालणार नाही. तंगड्या सर्वांनाच असतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

No comments

Powered by Blogger.