मुंबईतील ‘ईस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे नाव

मुंबईतील ‘ईस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे नाव


माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील ‘ईस्टर्न फ्री वे’ मार्गाला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नगरविकास विभागाला केली. दक्षिण मुंबईतील पी.डिमेलो रोड ते पूर्व द्रुतगती महामार्गाला चेंबूरपर्यंत जोडणारा हा मार्ग १६.८ किमी लांबीचा आहे. यामुळे पुणे आणि गोव्यातून दक्षिण मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईत बाहेर जाणाऱ्या वाहनांना जलदगतीने पोहोचता येते.
दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री या नात्याने तत्कालीन आघाडी सरकारच्या राजवटीत मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘ईस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ‘ईस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना पवार यांनी या बैठकीत केली. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या जेएनआरएमयू १४३६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्चाचा हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत १४ जून २०१३ रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. 
 
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुल वाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी वित्त, परिवहन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहन सेवा सुधारणेसंदर्भात अनेक सूचना केल्या.



No comments

Powered by Blogger.