आता बॉलिवूडचा खिलाडी ‘या’ तीन भूमिकेत दिसणार
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणजेच खिलाडी अक्षय कुमार मागील वर्षाप्रमाणे
यंदाच्या वर्षी देखील चित्रपटाचा पाऊस पाडणार आहे. मार्च महिन्यात तो
‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार असून त्यानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘पृथ्वीराज’ या
चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण याव्यतिरिक्त अक्षय कुमार काही
वेळापूर्वी एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो
वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिलं, ‘लवकरच
चाहत्यांसाठी आणखी एक मसालेदार गोष्ट सादर करणार आहे.’ अक्षयचा हा फोटो
जाहिरातीशी संबंधी असू शकतो असा अंदाज लावला जात आहे.
अक्षय कुमारने हा फोटो शेअर असं लिहिलं की, ‘एक से भले दो, दो से भले
तीन…बाप रे बाप.’ हे असं कॅप्शन पाहून चाहते अक्षय कुमारचा नवीन चित्रपट
असेल असा अंदाज लावत आहेत. तसंच या चित्रपटाचं नावं बाप रे बाप असेल असा
देखील अंदाज लावला जात आहे. अक्षय कुमारचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर
व्हायरल होत आहे.लवकरच अक्षय कुमार बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफसोबत ‘सूर्यवंशी’ या
चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट २७ मार्चला
प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा
चित्रपटाची निर्मिती झाली असून रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन
केले आहे. या चित्रपटानंतर अक्षय कुमार ईदच्या मुहूर्तावर खास ‘लक्ष्मी
बॉम्ब’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय ‘अतरंगी रे’, ‘बच्चन
पांडे’, ‘पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
येणार आहे.
Post a Comment