'बाहुबली'चा भल्लालदेवनं केलं 30 किलो वजन कमी
बाहुबली सिनेमात भल्लालदेव ही खलनायकी भूमिका
साकारणारा अभिनेता राणा दग्गुबाती सर्वांच्या लक्षात राहिला. राणाला या
सिनेमानं एक वेगळीच ओळख मिळवून दिली. या सिनेमात पिळदार शरीर आणि दमदार
पर्सनॅलिटी असलेल्या राणानं यासाठी बरीच मेहनत घेतली होती. पण आता मात्र तो
याच्या बरोबर उलट दिसत आहे. कारण राणा दग्गुबातीनं थोडं-थोडकं नाही तर
तब्बल 30 किलो वजन कमी केलं आहे. हे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यानं त्याचा
आगामी सिनेमा ‘हाथी मेरे साथी’साठी केलं आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही
फोटो समोर आले आहेत जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
राणा दग्गुबातीन
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती 30 किलो वजन कमी केल्यानंतर त्याची अवस्था
कशी झाली होती याचा खुलासा केला. 35 वर्षीय राणा दग्गुबाती हाथी मेरे साथी
या सिनेमात एका सामान्य जंगलात राहणाऱ्या माणसाची भूमिका साकारली आहे. या
भूमिकेत फिट बसण्यासाठी राणाला त्याचं वजन कमी करावं लागलं. यासाठी त्यानं
30 किलो वजन कमी केलं. यासाठी स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो केला तसेच टफ
ट्रेनिंग घेतलं आहे. या सिनेमात राणा दाढी वाढलेल्या लुकमध्ये पाहायला
मिळणार आहे. तसेच त्यानं आहारातून प्रोटीन आणि मीठ सुद्धा कमी केलं होतं.आपल्या वेट लॉसबद्दल बोलताना राणा म्हणाला, प्रभु सोलोमोन सर यांना ही
भूमिका रिअल असावी असं वाटत होतं. त्यासाठी मला त्याप्रमाणे फिटनेस ठेवायचा
होता आणि वजन कमी करायचं होतं. हे खरंच खूप कठीण होतं. कारण माझं फिजिक्स
नेहमीच खूप हेवी होतं. बारीक दिसण्यासाठी मी जवळपास 2 वर्ष फिटनेस ट्रेनिंग
घेतलं होतं. त्याशिवाय मला माझ्या डाएटमध्येही अनेक बदल करावे लागले. मी
फार कमी जेवण करत होतो.
राणा दग्गुबातीचा हाथी मेरे साथी हा सिनेमा येत्या 2 एप्रिलला रिलीज होणार
आह. हा सिनेमा जंगल, जंगलातील प्राणी आणि तिथे राहणारा एक माणूस यांच्यावर
आधारित आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये रिलीज
होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग भारतासोबत इतर देशांमध्येही झालं आहे. या
सिनेमात बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट याची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत
दिसणार आहे. याशिवाय जोया हुसैन आणि श्रेया पिळगांवकर सुद्धा दिसणार आहेत.
Post a Comment