दिल्ली हिंसाचार:परीक्षेला जाते सांगून गेली 'ती' घरी परत आलीच नाही

पूर्व उत्तर दिल्लीतील हिंसाचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी परीक्षेला गेलेली 13 वर्षांची विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेली विद्यार्थिनी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. सोमवारी ही विद्यार्थिनी शाळेत परीक्षा द्यायला गेली होती. मात्र सोमवारपासून दोन दिवस परत घरी आलीच नसल्याची तक्रार पालकांनी दाखल केली आहे. ही विद्यार्थिनी दिल्लीतील सोनिया विहार इथे तिच्या कुटुंबियांसोबत राहात होती.
विद्यार्थिनीच्या वडिलांचा गार्मेंट्सचा व्यवसाय आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता मुलीला आणण्यासाठी शाळेत जायचं होतं. मात्र त्याच वेळी त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमावाकडून हिंसाचार सुरू होता. त्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते. त्यानंतर आजपर्यंत त्यांची मुलगी घरी आलीच नसल्याचं त्यांनी दिल्ली पोलिसांनी सांगितलं. वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता असल्याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

No comments

Powered by Blogger.