सोलापूर विमानतळ परिसरात भीषण आग
सोलापूर विमानतळ परिसरात भीषण आग लागली आहे. या ठिकाणी आग नियंत्रणात
आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
वाळलेलं गवत पेटल्याने ही आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे
प्रयत्न सुरु आहेत. संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही आग लागली आहे. ही आग
नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीचे लोळ आणि
धुराचे लोट या परिसरात चांगलेच वाढलेले दिसून येत आहेत.सोलापूर विमानतळ परिसराची अत्यंत दुरवस्था झाली होती. काही दिवसांपूर्वी
त्यासंबंधीचं वृत्तही समोर आलं होतं. आता या विमानतळ परिसरात भीषण आग लागली
आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सात ते आठ गाड्या पुरेशा नाहीत. मात्र
तरीही अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आणखी गाड्या पाठवण्याची खबरदारी घेतली
गेली आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. आता या विमानतळ परिसरात
मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी
अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी
झालेली नाही. तसेच नुकसानही झालेले नाही. मात्र या समस्येकडे आणि विमानतळ
परिसराकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी
सोलापूरकरांकडून केली जाते आहे
Post a Comment