आजचे राशीभविष्य, गुरुवार , ०६ फेब्रुवारी २०२०

 1. मेष:-
  जवळचा प्रवास कराल. हातातील कामाला गती येईल. मानसिक चांचल्या जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल.
 2. वृषभ:-
  कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास जाणवेल. योग्य संधीची वाट पहावी. मानसिक स्थैर्य जपावे.
 3. मिथुन:-
  एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचारांचे कौतुक कराल. मनातील निराशा दूर सारावी. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका.
 4. कर्क:-
  जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरांपासून सावध राहावे.
 5. सिंह:-
  कौटुंबिक प्रश्न मार्गी लावावेत. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा. मनातून तिरस्कार काढून टाकावा. व्यापारात प्रगती करता येईल.
 6. कन्या:-
  भावंडांशी मतभेद संभवतात. हातातील अधिकार योग्यवेळी वापरावेत. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल.
 7. तूळ:-
  आर्थिक व्यवहार जपून करावेत. मौल्यवान वस्तू जपून वापराव्यात. हित शत्रूंचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी.
 8. वृश्चिक:-
  उष्णतेचे त्रास संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
 9. धनु:-
  सामाजिक बांधीलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागाल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराचा लाडीक हट्ट पुरवाल.
 10. मकर:-
  कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वीकारावे लागतील.
 11. कुंभ:-
  मनातील विचारांना आवर घालावी लागेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. योग्य तर्क बांधावा.
 12. मीन:-
  बढतीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कलेसाठी वेळ काढावा. सर्वांशी हसून-खेळून वागाल.

No comments

Powered by Blogger.