आंबोली घाटात गाडीत जळून महिलेचा मृत्यू

आंबोली घाटात गाडीत जळून महिलेचा मृत्यू
आंबोली वरून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी व्हॅगनार कार अपघातग्रस्त झाल्यानंतर पेट घेतल्याने जळून खाक झाली. या गाडीमध्ये पती—पत्नी असे दोघे प्रवास करत होते. गाडीने पेट घेतल्यानंतर पतीने गाडीतून उडी घेतली. तर पत्नी सीटबेल्ट लावले असल्यामुळे तिला स्वत:चा प्राण वाचवता आला नाही.
गाडी संरक्षक धडकल्यानंतर पूर्णपणे जळून खाक झाली तत्पूर्वी या गाडीने चौकुळ कुंभवडे येतील सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धबधब्याच्या अलीकडे धडक दिली होती. या धडकेनंतर घाबरून पळून जात असताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. नाही तोपर्यंत चालत्या गाडीने पेट घेतला होता. या परिस्थितीत चालकाने गाडीच्या बाहेर उडी मारली . चालकही ही आगीच्या झपाटय़ात आला होता. गाडीतून उडी मारल्यानंतर गाडी समोरील संरक्षक कठडय़ाला जाऊन आदळली तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता. असे त्या वेळी समोरून येणऱ्या वाहनचालकांनी सांगितले.
आगीची तीव्रता इतकी भीषण होती की  त्याच्या पत्नीला वाचवणे अशक्य होते त्यामुळे त्याची पत्नी अक्षरश: जळाली. आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते मायकल डिसूजा राजू राऊळ उत्तम नार्वेकर अजित नार्वेकर नारायण चव्हाण विशाल बांदेकर अनिल नार्वेकर अमोल करपे यांनी तात्काळ पाण्याने भरलेली गाडी त्याठिकाणी नेत भिजवली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. जखमी चालकाला सावंतवाडीला १०८ रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती त्यामुळे गाडीचा नंबर व इतर माहिती तसेच जखमी व मृताचे नावही समजू शकले नाही. 

No comments

Powered by Blogger.