‘३७० कलम’वर वरिष्ठ घटनापीठासमोर सुनावणी नाही - सर्वोच्च न्यायालय

Image result for 370 kalam
‘३७० कलम’वर वरिष्ठ घटनापीठासमोर सुनावणी नाही - सर्वोच्च न्यायालय
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम केंद्र सरकारनं रद्द केलं. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी वरिष्ठ घटनापीठासमोर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
जम्मू काश्मारमधून ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाला राजकीय पक्षांसह संघटनांनी विरोध केला होता. हा निर्णय चुकीचा असल्याचा सांगत संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. ३७० कलमासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.
३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण वरिष्ठ घटनापीठाकडं पाठवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयं निर्णय घेणारं होतं. त्यामुळे या सुनावणीकडं सगळ्याचं लक्ष होतं. सोमवारी (२ मार्च) झालेल्या सुनावणीत न्यायालयानं वरिष्ठ घटनापीठाकडं याचिका देण्यास नकार दिला.

No comments

Powered by Blogger.