CAA ला विरोध करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी

Image result for bjp
परभणी जिल्ह्यातील उपनगराध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणं त्यांचा चांगलंच महागात पडलं आहे. अनुशासनाचं कारण देत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपाची सत्ता असलेल्या नगरपालिकेत सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात ठराव संमत करण्यात आला होता. तसंच तो ठराव केंद्रालाही पाठवण्यात आला. यावरून अनुशासनाचं कारण देत पक्षानं पालम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली.
भाजपाची सत्ता असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेत सर्वसंमतीने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. “हा प्रस्ताव २८ फेब्रुवारी रोजी कोणाचाही विरोध न होता पारीत झाला. नगरपरिषदेत २७ नगरसेवक आहेत व तीन सहस्वीकृत सदस्य आहेत,” असं बोराडे यांनी सांगितलं होतं. “स्थानिक लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या बाजूने होते. प्रस्ताव पारीत होण्याच्या दोन दिवस अगोदर एक बैठक बोलवण्यात आली होती. ज्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य व मुस्लीम समुदायाच्या सात नगरसेवकांकडून करण्यात आली होती,” असंदेखील त्यांनी नमूद केलं होतं.

No comments

Powered by Blogger.