येस बँक इफेक्ट:एका मिनिटात ४ लाख कोटींचे नुकसान

करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारावर विपरित परिणाम होत असताना, आता येस बँकेवरील निर्बंधांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बँकेच्या खातेदारांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे.
बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १००० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ३५० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. निफ्टी ११ हजारपेक्षा खाली आहे.
करोना व्हायरसमुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसल्याने आधीच शेअर बाजारामध्ये निरुत्साह आहे. त्यात आता येस बँकेवरील निर्बंधांची भर पडली आहे. येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने आरबीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसत नाहीय. येस बँकेच्या शेअरमध्ये २५ टक्के तर एसबीआयच्या शेअरमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली आहे.

No comments

Powered by Blogger.