देशभरात १७० जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट

देशभरात १७० जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट
देशभरात १७० जिल्हे हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इतकंच नाही तर देशभरातल्या जिल्ह्यांचं वर्गीकरण हे तीन प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. हॉटस्पॉट असलेले जिल्हे, हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि ग्रीन झोन असलेले जिल्हे असे हे तीन प्रकार आहेत. देशात अजूनही समूह संसर्गाने करोनाचा संसर्ग झालेला नाही ही बाब महत्त्वाची आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
लॉकडाउनसाठी या विभागवारीचा उपयोग होईल. ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे तिथे काही व्यवहार सुरु होऊ शकतात मात्र लॉकडाउन कायम असेल असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. आपला देश करोनाशी योग्य पद्धतीने लढा देतो आहे. अशावेळी एक चूकही महागात पडू शकते असंही ते म्हणाले.

No comments

Powered by Blogger.