करोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारचा करदात्यांना दिलासा

करोना व्हायरसच्या संकटामुळे सरकारचा करदात्यांना दिलासा
इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरण्याच्या मुदतीत वाढ केल्यानंतर आता सरकारने त्याच्या फॉर्ममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या नवीन फॉर्मची माहिती या महिन्याच्या अखेरीस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने दिली आहे.
करोना व्हायरसच्या या संकटामुळे सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स संदर्भातील अनेक कामांसाठी ३१ मार्च ही डेडलाइन असते. पण ती यावेळी वाढवून ३० जून करण्यात आली आहे. करोनामुळे करदात्यांना रिटर्न भरताना अडचणी येतील, हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुदतवाढीची घोषणा केली होती.
त्यानंतर सीबीडीटीने स्पष्ट केले की, एप्रिल ते जून २०२० या काळात केलेल्या गुंतवणुकीचा किंवा व्यवहाराचा फायदा करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना घेता यावा यासाठी फॉर्ममध्ये बदल करण्यात येत आहेत. त्यात योग्य ते बदल केल्यानंतर ३१ मेपासून रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

No comments

Powered by Blogger.