भारतातील 29 % केसेस मर्कजशी संबंधित - आरोग्य मंत्रालय
![]() |
भारतातील 29 % केसेस मर्कजशी संबंधित - आरोग्य मंत्रालय |
देशात आतापर्यंत 14 हजार 378 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी
4291 केसेस म्हणजे 29.8% पॉझिटिव्ह रुग्ण एकाच स्रोतापासून म्हणजे
निझामुद्दीन मर्कज समूहातून निर्माण झाले असल्याचे आढळले आहे, अशी माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 23 राज्य आणि काही
केंद्रशासित प्रदेशांमध्ये मर्कजच्या कार्यक्रमातील व्यक्तींना कोरोनाची
लागण झाली आहे. यात सर्वाधिक तमिळनाडूमध्ये मर्कज कार्यक्रमातील कोरोना
बाधित केसस सापडल्या आहेत. जिल्हा पातळीवर राबवलेल्या चांगल्या
कार्यक्रमांमुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचेही आरोग्य मंत्रालयाने
सांगितले.
दिल्लीतील निझामुद्दीन येथे तब्लिगी जमातचा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रम देशातील अनेक भागात कोरोनाचा प्रसार करण्यात कारणीभूत ठरला असल्याची बाब समोर आली आहे. देशातील 14 हजार 378 कोरोना बाधितांपैकी 4 हजार 291 केसेस ह्या या कार्यक्रमातील व्यक्तींमुळे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
तामिळनाडूत – 84 %
नवी दिल्लीत – 63 %
तेलंगणात - 79 %
आंध्र प्रदेश – 61 %
उत्तर प्रदेश – 59 % केसेस मर्कजशी संबंधित आहेत.
देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के
0 ते 45 वय - 14.4 टक्के मृत्यू
45 ते 60 वय - 10.3 टक्के मृत्यू
60 ते 75 वय - 33 टक्के मृत्यू
75 वयापेक्षा जास्त - 42 टक्के मृत्यू
या सगळ्या मृत्यू झालेल्या लोकांपैकी 83 टक्के लोकांना उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार आणि इतर गंभीर आजार होते.

Post a Comment