Jio ची धमाकेदार ऑफर

Jio ची धमाकेदार ऑफर
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना चार दिवस मोफत 2GB अतिरिक्त मोबाइल इंटरनेट डेटा देत आहे. अतिरिक्त 2GB डेटाचा फायदा ग्राहकांना ते सध्या वापरत असलेल्या प्लॅनवर मिळेल.
रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात ‘Jio Data Pack’ हा दररोज 2GB डेटा बेनिफिटचा प्लॅन आणला होता. या प्लॅनमधील फायदे मार्च महिन्याच्या अखेरिस युजर्सच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आले होते. ‘टेलिकॉम टॉक’च्या वृत्तानुसार, आता कंपनीने पुन्हा एकदा असाच प्लॅन आणला असून युजर्सना चार दिवसांच्या वैधतेसह दररोज 2जीबी एक्स्ट्रा डेटा फ्रीमध्ये दिला जात आहे. ‘Jio Data Pack’ अंतर्गत कंपनी ग्राहकांना दररोज 2GB एक्स्ट्रा डेटा देत आहे. 27 एप्रिलपासून कंपनीकडून एक्स्ट्रा डेटा ग्राहकांच्या अकाउंटध्ये क्रेडिट करण्यास सुरूवात झाली आहे. अकाउंटमध्ये एक्स्ट्रा डेटा क्रेडिट झाल्यानंतर याची वैधता चार दिवस असेल. या ऑफरमुळे ग्राहकांना दररोज मोफत 2GB एक्स्ट्रा डेटा वापरायला मिळतोय. म्हणजे जर तुमच्या नंबरवर दररोज 1.5जीबी डेटामर्यादा असलेला 599 रुपयांचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असेल तर या ऑफरनुसार तुम्हाला एकूण 3.5जीबी डेटा मिळेल.
मात्र, कंपनीची ही ऑफर मर्यादित ग्राहकांसाठी आहे. या ऑफरसाठी ग्राहकांची ‘रँडम’ निवड केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, युजर्स My Jio अ‍ॅपमध्ये जाऊन जिओ डेटा पॅकच्या उपलब्धता चेक करु शकता.

No comments

Powered by Blogger.