केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सांगणार , 20 लाख कोटी रुपयांचा कसा होणार वापर?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सांगणार , 20 लाख कोटी रुपयांचा कसा होणार वापर?
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या 10 टक्के एवढं हे पॅकेज आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण कोणकोणत्या क्षेत्राला किती रक्कम दिली जाणार आहे, याबाबत माहिती देणार आहेत. तसंच या पॅकेजचा विनियोग कसा होणार आहे, याबाबत देखील निर्मला सीतारमण माहिती देणार आहेत. सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण याबाबत माहिती देणार आहेत.

प्रधानमंत्र्यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल अशी अपेक्षा कॉंग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी पॅकेजचं विवरण आल्यावरच आपल्याला माहीत होईल की कुठल्या क्षेत्राला किती फायदा होईल, असंही म्हटलं होतं. आता खुद्द  केंद्रीय अर्थमंत्री याबाबत माहिती देणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 'आत्मनिर्भर भारत अभियान' या अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजद्वारे देशातील जनतेला फायदा होणार आहे. या आत्मनिर्भर अभियान भारत पॅकेजमुळे देशाला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातलं सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश असणार आहे. या विशेष पॅकेजच्या माध्यमातून देशातील विविध घटकांना, आर्थिक व्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचा पाठिंबा मिळेल. 20 लाख कोटी रुपयांच्या या पॅकेजमुळे 2020 मध्ये देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विकासाच्या प्रवासाला नवीन वेग मिळेल, असं मोदींनी म्हटलं होतं.

आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये सर्व स्तरावर जोर देण्यात आला आहे. या आर्थिक पॅकेजच्या मदतीने लघू उद्योग, मध्यम उद्योग, गृह उद्योगांना फायदा होईल. देशातील श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे, जे प्रत्येक परिस्थितीत देशवासियांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. देशातील मध्यमवर्गासाठी हे पॅकेज आहे, जे प्रामाणिकपणे कर भरतात आणि देशाच्या विकासात योगदान देतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.

No comments

Powered by Blogger.