नसीरुद्दीन शाह रुग्णालयात असल्याच्या अफवा
![]() |
नसीरुद्दीन शाह रुग्णालयात असल्याच्या अफवा |
इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन महान कलाकारांनी लागोपाठ या जगाचा निरोप
घेतला. त्यातच ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा यांचीही प्रकृती बिघडली असून
त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याच्या बातम्या सोशल
मीडियावर फिरू लागल्या आहेत. सर्वात आधी २८ एप्रिल रोजी इरफान खान यांना
रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ एप्रिलला इरफान खान यांचं निधन झाले.
त्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रूग्णालयात दाखल केले. ३०
एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचं दिर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल केल्याचे वृत्त
सोशल मीडियावर पसरले आणि बॉलिवूडसह देशातील लोक सुन्न झाले. पण नसीरुद्दीन
शाह यांची प्रकृती ठीक असून ते घरीच असल्याचे स्पष्टीकरण त्यांचा मुलगा
विवानने ट्विट करत दिली आहे.
मुलाशिवाय मॅनेजर आणि स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी फेसबुक पोस्टद्वारे
आपण ठीक असून लॉकडाउनचे पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही
अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विवान शाहने ट्वीट करत म्हटलेय की, ‘सर्व ठीक आहे. बाबा एकदम ठीक आहेत.
त्यांचं स्वास्थ बिघडल्याच्या सर्व अफवा आहेत. त्यांनी इरफान भाई आणि
चिंटूजीसाठी प्रार्थना केली आहे. दोन्ही कुटुंबाविषयी शोक व्यक्त केला.
दोघांच्या आत्मास शांती लाभो.’
मॅनेजर काय म्हणाले –
नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा गुरूवारी रात्रींपासून सुरू झाल्या. या साऱ्या बांतम्यावर त्यांचे मॅनेजर जयराज यांनी पूर्णविराम दिला असून या सर्व अफवा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, नसीरुद्दीन शाह पत्नी आणि मुलांसोबत कर्जत येथील फार्महाउसवर आहेत.

यांच्याबद्दलही उडाल्या अफवा –
इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा उडाल्या. त्याशिवाय धर्मेंद्र आणि बप्पी लहरी यांचीही प्रकृती बिघडल्याच्या अफवा उडाल्या.
इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नसीरुद्दीन शाह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा उडाल्या. त्याशिवाय धर्मेंद्र आणि बप्पी लहरी यांचीही प्रकृती बिघडल्याच्या अफवा उडाल्या.
Post a Comment