हे पदार्थ खा आणि यकृत बनवा अधिक मजबूत!
![]() |
हे पदार्थ खा आणि यकृत बनवा अधिक मजबूत! |
यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांपैकी एक होय. शरीराचे कार्य
सुरळीत सुरु राहावे यासाठी यकृताचे योगदान मोठे असते आणि म्हणून यकृत सक्षम
ठेवणे, त्याची काळजी घेणे हि आपली जबाबदारी असते. यकृतामध्ये थोडी जरी
समस्या आली तर त्याचा परिणाम हा थेट पूर्ण शरीराला भोगावा लागतो. वेगवेगळे
घातक आजार शरीराला विळखा घालतात. चुकीच्या खाद्यपदार्थांच्या सेवनाने
यकृताला सामान्यत: त्रास भोगावा लागतो. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याकडे
विशेष लक्ष प्रत्येक व्यक्तीने देणे गरजेचे आहे जेणेकरून यकृतामध्ये कोणती
गंभीर समस्या उद्भवणार नाही. यकृताला सक्षम आणि मजबूत ठेवण्यासाठीच आम्ही
तुम्हाला काही अशा खाद्यपदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यांचे तुम्ही नियमित
रुपाने सेवन करायला हवे. चला तर जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल!
लसुण-
लसुणामध्ये अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे
मानले जातात. यकृताला सक्षम ठेवण्यासाठी सुद्धा लसूण महत्त्वपूर्ण भूमिका
बजावते. अनेक वैज्ञानिक संधोधनानुसार हा दावा करण्यात आला आहे की लसूणचे
सेवन रोज केल्याने यकृत निरोगी राखण्यात मोठे सहकार्य मिळते. रोज सकाळी एका
ग्लास पाण्यासोबत लसूण खाणे सुद्धा आरोग्यदायी सिद्ध होते. तर मग जर
तुम्ही अजुनही लसूण खात नसाल तर आपल्या यकृताच्या बळकटीसाठी आवर्जुन लसणाचे
सेवन सुरु करा.
पपई -
पपई आता बाजारात कधीही सहज उपलब्ध होते. फ्रुट सलाड मध्ये तर आवर्जून पपईचा
समावेश असतो. हे असे फळ आहे जे चविष्ट असण्यासोबत गुणकारी सुद्धा आहे.
तुम्ही हवं तर याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. पपई तुम्हाला हायड्रेट
ठेवण्यासोबतच तुमच्या शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्वे सुद्धा देते. यकृताला
बळकटी देण्यातही पपईचे सेवन मोलाचे ठरते. यकृताला डिटॉक्सिफाई करण्याचे
काम पपईद्वारे केले जाते. म्हणून तुम्ही आठवड्याला किमान २ वेळा तरी पपई
खायला हवी.
पालक-
पालेभाज्या नेहमी खाव्यात हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय आणि जे की अगदी
खरंय. कारण पालेभाज्यांतून शरीराला अतिशय गरजेची तत्वे मिळतात. या
पालेभाज्यांपैकी महत्त्वाची आणि अति गुणकारी भाजी म्हणजे पालक! पालकमध्ये
जीवनसत्त्व 'क' मोठ्या प्रमाणात आढळतं. पालक हे आपल्या शरीराची रोगप्रतिकार
शक्ती मजबूत करतं यामुळे यकृताला अधिक सक्षमता मिळते. त्यामुळे जर
तुम्हाला तुमचे यकृत कमजोर पडू नये असं वाटत असले तर तुम्ही आवर्जुन पालकचा
ज्युस प्यायला हवा.
हळद-
हळदीमध्येही अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला आजारांपासून
वाचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. यकृताला बळकट करण्यासाठी आणि त्याचं
कामकाज सुरळीत राहावं यासाठी हळदीचे सेवन करायला हवे. गोल्डन ड्रिंक अर्थात
हळद आणि दुध यांचे एकत्रित सेवन करणे सुद्धा लाभदायक ठरू शकते. यामुळे
सुद्धा यकृत योग्य पद्धतीने काम करत राहील आणि शरीर सुद्धा सुस्थितीमध्ये
राहील. आपल्या घरात हळद तर सहज उपलब्ध असते, त्यामुळे इतर कोणत्याही
पदार्थापेक्षा हळदीचे सेवन आपण सहज करू शकतो आणि यकृताला बळकटी प्रदान करू
शकतो.
आवळा -
आवळा एक असे फळ आहे जे विविध प्रकारे खाण्यासाठी वापरले जाते. याची चटणी
बनते, याचं लोणचं बनतं, याचा ज्यूस बनतो, याचा मुरंबा बनतो. यकृत मजबूत
ठेवण्यासाठी आवळ्याचा मोठा फायदा होतो. एका वैज्ञानिक संशोधनावर आधारित
प्रकाशित झालेल्या अहवालानुसार यकृतासाठी आवळ्याचे सेवन अति गुणकारी
सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही खाद्य प्रकारातील आवळ्याचे सेवन
केले तर ते यकृतासाठी लाभदायकच ठरते. याव्यतिरिक्त त्वचा उजळवण्यासाठी
सुद्धा आवळा खूप फायदेशीर मानला जातो.
तर मंडळी हे आहेत काही
रोजच्या जीवनातील पदार्थ जे तुमच्या यकृताला आवश्यक असलेली सक्षमता आणि
मजबुतता प्रदान करू शकतात. यामुळे यकृताला कोणतेही आजार होत नाहीत.
तुम्हाला सुद्धा तुमचे यकृत आजार विरहित राहावे असं वाटत असेल तर या
पदार्थांचे सेवन आवर्जुन करा. हा लेख आपल्या इतर मित्रमंडळींसोबत देखील
नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा यकृताचे शरीरातील महत्त्व आणि यकृताला
बळकट ठेवण्याचे हे उपाय सांगा.
Post a Comment